Weather Update : मनालीहून वेण्णा लेक परिसरात जास्त थंडी; हवामान खात्याकडून Yellow Alert

Weather Update : थंडीमुळं अनेकांचेच पाय पर्यटनस्थळांकडे वळले आहेत. पण, काही भागांमध्ये मात्र हिमवृष्टीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं तुम्ही कुठे जाताय तिथे काळजी नक्की घ्या. नाहीतर... 

Updated: Jan 25, 2023, 07:36 AM IST
Weather Update : मनालीहून वेण्णा लेक परिसरात जास्त थंडी; हवामान खात्याकडून Yellow Alert  title=
Weather Update satara Mahabaleshwar vitnessd lowest temprature rain predictions at himachal and uttarakhand

Weather Update : (Northern India) भारताच्या उत्तरेडे पश्चिमी झंझावाताचे परिणाम स्पष्टपणे दिसू लागले आहेत. ज्यामुळं काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. या झंझावातामुळं देशाच्या काही भागांमध्ये तापमानात वाढ झाली आहे, तर काही भागांमध्ये मात्र तापमान आणखी कमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यातच हवामान विभागानं येत्या काही दिवसांत हवामानाचे तालरंग कसे असतील यावरूनही पडदा उचलल्याचं पाहायला मिळत आहे. 

'स्कायमेट'च्या माहितीनुसार मागील 24 तासांमध्ये देशातील हवामानात अनेक बदल झाले. यामध्ये (Tamilndu) तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) हलक्या पावसाच्या सरीसुद्धा बरसल्या. तर (Jammu Kashmir) जम्मू काश्मीर, उत्तराखंड (Uttarakhand) आणि हिमाचलच्या (Himachal Pradesh) पर्वतीय भागांमध्ये जोरदार हिमवृष्टी झाली. 

महाराष्ट्र गारठला... (Maharashtra Winter wave)

देशाच्या उत्तरेकडे होणाऱ्या हवामान बदलांमुळे त्याचे थेट परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून गारठलेल्या मुंबईतील (Mumbai temprature) थंडीचा मुक्काम अद्यापही कायम आहे. तर, साताऱ्यातील (Satara)महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथेही थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारपासून राज्यात तापमान 11 अंशावर होतं. तर, वेण्णालेक (Venna Lake) परिसरात तापमान 7 अंशावर पोहोचलं होतं. पाचगणीतही (Panchgani) हवामानात सुखद बदलांची नोंद झाली असून, पर्यटकांची गर्दी या भागात वाढताना दिसत आहे. 

हेसुद्धा वाचा : Maghi Ganesh Jayanti 2023 : माघी गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल; घराबाहेर पडण्याआधी पाहा ही बातमी 

 

मुंबई आणि पुण्यासोबतच (Pune) थेट गोव्यातूनही (Goa) इथं येणाऱ्या पर्यटकांचा आकडा वाढला आहे. वाढलेल्या थंडीमुळं या भागातील पर्यटनस्थळं आणि अनेक हॉटेल्सही हाऊसफुल्ल झाले आहेत. 

बोचऱ्या थंडीत बरसणार पाऊसधारा... 

उत्तर भारतामध्ये बदलणारं हवामान लक्षात घेता इथं यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार इथं पुढील काही दिवस पावसाची हजेरी असेल. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाबचा उत्तर भाग आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांत पावसाची हजेरी असणार आहे. काही भागांना गारपिटीचाही तडाखा बसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सदरील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत असतानाच पावसानं हजेरी लावल्यास हवेत गारवा आणखी वाढण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. त्यामुळं नागरिकांना आरोग्याची काळजी घेत गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.