नारायण राणेंमुळे रिक्त झालेल्या जागेची ७ डिसेंबरला निवडणूक

   नारायण राणेंनी राजीनामा दिल्यावर निवडणूक आयोगानं विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक होणार आहे.

Updated: Nov 15, 2017, 09:31 AM IST
नारायण राणेंमुळे रिक्त झालेल्या जागेची ७ डिसेंबरला निवडणूक  title=

मुंबई :   नारायण राणेंनी राजीनामा दिल्यावर निवडणूक आयोगानं विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक होणार आहे.

येत्या 7 डिसेंबरला ही निवडणूक होतेय. शिवसेना आणि काँग्रेस यांचा राणेविरोध बघता ही निवडणूक राणेंना सोपी जाणार नाही असं सध्याची राजकीय समीकरणं सांगत आहेत.

राणेंना पुन्हा विधानपरिषदेवर यायचं असेल, तर या निवडणूकीत शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापैकी एका पक्षाचा पाठिंबा मिळावावा लागेल. त्यापैकी शिवसेना आणि काँग्रेस राणेंना पाठिंबा देणं शक्य केवळ अशक्य आहे. त्यामुळे या निवडणूकीत फोडाफोडीचं राजकारण मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचं राजकारण अटळ असल्याचं स्पष्ट दिसंतय.

विद्यमान 288 सदस्यांच्या विधानसभेनुसार
भाजप              122
शिवसेना              63
काँग्रेस                42
राष्ट्रवादी काँग्रेस :   41
इतर            20