नागपूरात चार तासात तीन खून

नागपूरात तीन खून झाल्याची धक्कादायक घटना...

Updated: Aug 22, 2019, 10:26 PM IST
नागपूरात चार तासात तीन खून  title=

नागपूर : भारताची उपराजधानी नागपुरात बुधवारी चार तासात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात नामांकित प्रॉपर्टी डिलरसह दोन तरूणांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिनुसार पहिली घटना ही नंदनवमधील केडीके कॉलेज रोडवरील राजेंद्रनगर येथे घडली आहे. 

पहिली हत्या
'खरबी' गरीब नबाज चौक येथे राहणारा मो. आसिफ शेख मो. सईद (25) हातगाडीवर, मिरची, अद्रक, कोथिंबीर विकण्याचं काम करत होता. त्याचवेळी अचानकपणे तीन आरोपी त्याच्या ठेल्यावर आले. त्यांच्यापैकी एकाने अद्रक आणि मिरची खरेदी केली. मात्र पैसे न देता निघून जात असतांना आसिफने त्याला पैसे मागितले, पण त्याने शिवीगाळ करायला आणि दादागिरी करण्यास सुरूवात केली. त्यावेळी आसिफला वाचविण्यासाठी त्याचा मित्र सय्यद इमरान, सय्यद निजाम (22) हसनबाग धावून आला असता, त्या आरोपीने इमराला पकडले आणि त्याच्या छातीवर चाकूचे वार केला. यात इमरान जागीच ठार झाला. 

दुसरी हत्या
दुसरे हत्याकांड हे मुंगसाजी नगरमध्ये घडले आहे. सेनापतीनगरमध्ये राहणारा विक्की विजय डहाके (22) याचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. विक्की हा हातमजूरी करून स्वत:चा उदरनिर्वाह करत होता. बुधवारी ११ वाजता विक्की हा मृतावस्थेत आढळला. अज्ञात आरोपींनी त्याच्या पायावर, पोटावर, पाठीवर वार करून त्याला ठार मारले. याप्रकरणाचा नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

तिसरी हत्या
ही नागपूर शहराच्या मध्यभागी सदरमध्ये घडली आहे. कुलरचा व्यवसाय करणारे ऋषी खोसला यांना मध्यरात्री घरी परत जात असतांना त्यांना युथ फोर्सचा संस्थापक मिकी बक्षी आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांची कार रस्त्यावर अडवून धारदार शस्त्राने त्यांची हत्या केली. चार तासात तीन हत्यामुळे नागपूरमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची नागपूर पोलिस प्रशासनने गंभीर दखल घेतली आहे. या घटनावर पोलीसाचा तपास सुरू आहे.