बंगळुरु : चांद्रयान-२ ने चंद्राचे पहिले छायाचित्र पाठविले आहे. हे छायाचित्र चंद्रापासून २६५० किमी अंतरावरुन काढण्यात आला आहे. चंद्राचे सौंदर्य किती अलौकिक आहे, हे या छायाचित्रावरुन स्पष्ट होत आहे. चांद्रयान-२ ने त्याचा अवघड टप्पा २१ ऑगस्ट रोजी पूर्ण केला आहे. चांद्रयान-२ हे चंद्राच्या कक्षेत दाखल झाले. २१ ऑगस्टला सकाळी ९ वाजून २ मिनिटांनी ही प्रक्रिया पूर्ण झाली. १४ ऑगस्टला हे चांद्रयान-२ चंद्राच्या दिशेने कक्षेकडे मार्गस्थ करण्यात यश आले आहे.
चांद्रयान-२ मध्ये ऑर्बिटर, लँडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) यांचा समावेश आहे. या यानाचा कार्यकाळ एक वर्ष असून चंद्रावरील एक दिवस हा भारताच्या १४ दिवसांबरोबर असतो. आता याच चांद्रयान-२ ने चंद्राचे पहिलेवहिले छायाचित्र पाठविले आहे.
Take a look at the first Moon image captured by #Chandrayaan2 #VikramLander taken at a height of about 2650 km from Lunar surface on August 21, 2019.
Mare Orientale basin and Apollo craters are identified in the picture.#ISRO pic.twitter.com/ZEoLnSlATQ
— ISRO (@isro) August 22, 2019
चांद्रयान-२ ही इस्रोची दुसरी चांद्र मोहीम आहे. त्यात हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. चंद्राचा जन्म व उत्क्रांती तसेच त्याची स्थान शास्त्रीय आणि खनिज शास्त्रीय माहिती यात मिळणार असून अनेक प्रयोग अपेक्षित आहेत. चांद्रयान-१ च्या मोहिमेत चंद्रावर पाण्याचे रेणू सापडले होते. त्याचा पाठपुरावा आताच्या मोहिमेत केला जाणार आहे.