वसुंधरा प्रतिष्ठानकडून अनोखे 'खिळेमुक्त झाड' अभियान !

लातूरच्या वसुंधरा प्रतिष्ठानच्यावतीने 'खिळेमुक्त झाड' हे  अनोखे अभियान राबविण्यात आले.  

Updated: Jun 14, 2018, 09:20 AM IST

 शशिकांत पाटील, झी मिडीया - लातूर : लातूरच्या वसुंधरा प्रतिष्ठानच्यावतीने 'खिळेमुक्त झाड' हे  अनोखे अभियान राबविण्यात आले.  लातूर शहरातील झाडांवर फलक आणि जाहिरात लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात खिळे ठोकण्यात आले आहेत. त्यामुळे सजीव असणाऱ्या या झाडांना बोलता येत नसले तरी याचा त्यांना मोठा त्रास आणि वेदना होतात. 

झाडांवर लोखंड खिळे असणे हे झाडांचे आयुष्यही कमी करणारे आहे. त्यामुळे शहराच्या विविध ठिकाणी असलेल्या झाडांवरील खिळे, लोखंडी तारा काढण्याचे अनोखे अभियानााने वसुंधरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात आले. 
 
 येत्या काही दिवसात शहरातील सर्वच झाङे ही खिळेमुक्त होतील. मात्र मनुष्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणाऱ्या झाडांना नागरिकांनी आपल्या क्षणिक कामासाठी झाडांना खिळे ठोकून वेदना देऊ नये असे आवाहनही यावेळी वसुंधरा प्रतिष्ठांच्यावतीने करण्यात आले.