पुणे जिल्ह्यात अनोखं लग्न, असा सोहळा पाहिलाच नसेल!

आता एक वेगळी बातमी. तुम्ही अनेक प्रकारची लग्न आणि आंदोलनं पाहिली असतील. मात्र पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात हे आगळंवेगळं लग्न तुम्ही आजपर्यंत कुठंही पाहिलं नसेल. 

Updated: Aug 24, 2017, 11:28 PM IST
पुणे जिल्ह्यात अनोखं लग्न, असा सोहळा पाहिलाच नसेल! title=
संग्रहित छाया

पुणे : आता एक वेगळी बातमी. तुम्ही अनेक प्रकारची लग्न आणि आंदोलनं पाहिली असतील. मात्र पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात हे आगळंवेगळं लग्न तुम्ही आजपर्यंत कुठंही पाहिलं नसेल. 

रस्त्यांवरील खड्ड्यांना वैतागून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बांधकाम विभागाचं खड्ड्यांशी लग्न लावून दिलं. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्याची निमंत्रण पत्रिका वाटण्यात आल्या. हा प्रेम विवाह असल्याचंही पत्रिकेत नमूद करण्यात आलंय. 

विशेष म्हणजे प्रतिकात्मक स्वरूपात उभ्या करण्यात आलेल्या नववधू आणि नवरदेवाची वाजत गाजत वरात काढण्यात आली. या सोहळ्याला नागरिकांनीही मोठी उपस्थिती लावली. तसंच मावळ तालुक्यात खड्डाविरहीत रस्ता दाखवा आणि १० हजाराचे बक्षीस मिळवा, अशी घोषणाही विवाहस्थळी करण्यात आली.