अहमदनगर : अचानक कांद्याचे भाव कमी झाल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी कोपरगाव इथंल्या कृषीउत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरु असताना तो बंद पाडत सभापतीच्या दालनासमोर ठिय्याही मांडला.
तीन दिवसांपूर्वी कांद्याला २३०० चा भाव होता तो अचानक १६०० वर कसा आला असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. यावेळी शेतकरी आणि व्यापा-यांमध्ये शाब्दीक चकमक झाल्यानं काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
कांद्याला योग्य भाव देऊ असं आश्वासन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी दिल्यानंतर शेतकरी शांत झाले. जर कांद्याला हमी भाव मिळाला नाही तर रास्ता रोको करु असा इशाराही शेतक-यांनी दिली. दरम्यान दुपारी तीन वाजता लिलाव परत सुरु झाला.