उदयनराजे म्हणाले, 'त्या कारट्यांनला तर मी सोडणार नाही...'

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार उदयनराजे यांचा, राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला. यानंतर

Updated: Oct 25, 2019, 12:40 PM IST
उदयनराजे म्हणाले, 'त्या कारट्यांनला तर मी सोडणार नाही...' title=

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार उदयनराजे यांचा, राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला. यावेळी आपण पवारांचा आदर करतो असं उदयनराजे यांनी आठवणीने सांगितलं आणि श्रीनिवास पाटील यांचं अभिनंदन केलं.

उदयनराजे म्हणाले, 'पाटीलसाहेबांनी आता मी केली त्यापेक्षा जास्त कामं करावीत, त्यासाठी त्यांना बेस्ट ऑफ लक. तसेच शरद पवारांनाही हे माहित आहे की, उदयनराजे कधी खोटं बोलत नाही', 'पावसाने राजकीय वातावरण बदललं असतं तर मी पावसातंच बसून राहिलो असतो, असंही मिश्किलपणे उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे तुम्हाला साथ देणाऱ्या तरूणांबद्दल तुम्ही काय म्हणाल या प्रश्नाला उत्तर देतांना, उदयनराजे आपल्या स्टाईलमध्ये सातारी भाषेत कौतुकाने म्हणाले, 'त्या कारट्यांनला मी सोडणार नाही, आणि ते देखील मला कधीच सोडणार नाहीत'.