धुळे : धुळे तालुक्यातील अनकवाडी शिवारात एक दीड ते दोन वर्षाचे बिबट्याचे पिल्लू विहिरीत पडले आहे. पाण्याच्या शोधात हे पिल्लू विहिरीत पडल्याचे सांगीतले जात आहे. वन विभागाने विहिरीतुन हे बिबट्याचे पिल्लू बाहेर काढण्यासाठी पिंजरा टाकण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. ही माहिती कळाल्यावर परिसरात बघ्यांची एकच गर्दी झाली होती.
सुरक्षेचा उपाय म्हणून पोलीसांनी जमावाला विहिरीपासून लांब नेले असून, सापळा टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या भागत असलेल्या बिबट्याच्या मादिला या सोबत अजून काही पिल्लं आहेत. बिबट्याचे पिल्लू पिंजऱ्यात अडकल्यानंतर त्याला धुळ्यात आणले जाणार असून या ठिकाणी त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.