पुण्यामध्ये 'श्वान शो'चं आयोजन

पुण्यात विविध प्रकारच्या श्वानांच्या शोचं आयोजन करण्यात आलं होतं.

Updated: Jan 7, 2018, 11:21 PM IST
पुण्यामध्ये 'श्वान शो'चं आयोजन  title=

पुणे : पुण्यात विविध प्रकारच्या श्वानांच्या शोचं आयोजन करण्यात आलं होतं. जर्मन शेफर्ड, अल्सेशियन, रॉटव्हीलर अशा नेहमीच्या श्वानांबरोबरच थेट परदेशातून आणलेल्या श्वानांच्या विविध जाती सुद्धा या शोमध्ये पाहायला मिळाल्या.

पूना केनेल कॉन्फडरेशन आणि सह्याद्री जर्मन शेफर्ड सोसायटीच्या वतीने हा डॉग शो आयोजित करण्यात आला होता. या डॉग शोमधून सर्वोत्कृष्ट श्वानांची निवड करून त्यांचा रोख बक्षिसं देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेत विविध जातीचे श्वान आणि त्यांच्या दिमाखदार वॉक यांनी उपस्थितीतांची मनं जिंकली.