नाशिक : भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावर सट्टा लावल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी सॉफ्टवेअर ऑपरेटरसह आणखी दोघांना ताब्यात घेतलंय.
संशयितांची संख्या आता अकरावर पोहचलीय. भारत न्यूझीलंड यांच्यात टी-20 सामना खेळवला गेला. या सामन्यावर बेटिंग सुरु असल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली होती.
त्यावेळी पोलिसांनी छापा टाकून चार जणांसह मोबाईल फोन, लॅपटॉप हार्ड डिस्क, महागड्या गाड्या असा 28 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.
पोलिसांनी छापा टाकल्यानंतर इतर संशयित फरार झाले होते. त्यातील चार ते पाच जणांना दोन दिवसांनी अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या महिती नुसार सोफ्टवेअर ऑपरेटर तुषार शहा याच्यासह विकी जाट या भाजी विक्रेत्याला अटक केलीय.