महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?, उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर?

Loksabha Nivdnuk Nikal 2024: उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत, सूत्रांची माहिती

कृष्णात पाटील | Updated: Jun 6, 2024, 01:27 PM IST
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?, उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर? title=
Two MLAs from North Maharashtra will go to Sharad Pawar group after loksabha election 2024

Loksabha Nivdnuk Nikal 2024:  लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा फटाका बसला आहे. तर, त्या तुलनेत महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले आहे. राज्यात भाजपच्या 9 जागा आल्या आहेत. तर, अजित पवार गटाला एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर आता मविआने विधानसभेसाठी कंबर कसली आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा मोठा भूकंप होऊ शकतो, अशी चर्चा असतानाच उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. 

अजित पवार गटातून एक आणि काँग्रेसमधून एक असे दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. उत्तर महाराष्ट्रातून शरद पवार यांनी दोन खासदार निवडून आणल्यानंतर पवार गटाची ताकद तिथं वाढली आहे. स्थानिक राजकी. परिस्थितीदेखील महाविकास आघाडीला अनुकूल असल्याने पवार गटात जाण्याचा अजित पवार गटातील आमदाराचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभेच्या 13 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस सध्या मोठा भाऊ ठरला आहे. मात्र असे असतानाही काँग्रेस पक्षातील एक नाराज आमदार शरद पवार गटात जाणार असल्याची माहिती समोर येतं आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदारांनी पक्षांतराचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा आहे. हे दोन आमदार कोण आहेत हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. 

अजित पवारांच्या बंगल्यांवर आज आमदारांची बैठक 

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांच्या बंगल्यांवर आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा आमदारांच्या मतदार संघात नेत्यांची चिंता व्यक्त केली. संविधान बदलणार असा बागुलबुवा करणे, जातीय समीकरण यांचा फटका बसल्याचा सूर काही नेत्यांनी बोलून दाखवला आहे. काही मतदार संघात युती असून मतांमध्ये रूपांतर नाही. काही विधानसभा मतदारसंघात युतीचे नेते एकत्र पण स्थानिक पातळींवर कार्यकर्त्यांनी मतं दिली नाही अशी स्थिती असल्याने यावर काही नेत्यांनी चर्चेत मुद्दा काढला.