खेळताना खड्डयात पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

येरवड्याच्या लक्ष्मीनगर भागात मातोश्री ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे.

Updated: Apr 30, 2018, 05:06 PM IST

पुणे : बांधकामासाठी खोदलेल्या खड्यात पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. रुद्र भुजबळ वय ६ आणि रुद्र चव्हाण वय ८ ही दोन मुले खेळत असताना खड्यात पडली. खड्यात ६ फूट पाणी साठलेले होते, त्यामुळे ही मुले पाण्यात बुडाली. 

येरवड्याच्या लक्ष्मीनगर भागात मातोश्री ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. शाळेच्या काही खोल्यांचं बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी दहा फूट खोलीचा खड्डा खोदण्यात आला आहे. तोच खड्डा या मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे.  

दुर्घटनेत बांधकाम ठेकेदाराची हलगर्जी लक्षात येते. त्यामुळे नागरीकांकडून संताप व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे, दोन चिमुकल्यांचा नाहक बळी गेलेल्यामुळे येरवडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.