चंद्रपूर ट्रक अपघातात मायलेकींचा मृत्यू

चंद्रपूर ट्रक अपघातात मायलेकींचा मृत्यू

Updated: Feb 16, 2019, 07:43 PM IST
चंद्रपूर ट्रक अपघातात मायलेकींचा मृत्यू title=

चंद्रपूर : वरोरा शहरातील आनंदवन चौकात भीषण अपघात झाला. या दुचाकीवरील मायलेकीचा मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ नागपुरात हलविण्यात आले आहे. एका कोळसा भरलेल्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील मिलमिले कुटुंब फुटपादवर जोरदार आदळले. या अपघातात मायलेकींचा जागीच मृत्यू झाला.

अल्का किशोर मिलमीले (३५) आणि समृद्धी किशोर मिलमिले (७) अशी मृतांची नावे आहेत. किशोर मिलमीले (४०) हे गंभीर जखमी झाले आहेत. किशोर मिलमिले हे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहेत. या अपघातानंतर वरोरा परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.