आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात बदल, जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Rate : गेल्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. तुम्ही जर गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर पेट्रोल डिझेलचे आजचे दर नक्की तपासा...

श्वेता चव्हाण | Updated: Feb 5, 2024, 09:02 AM IST
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात बदल, जाणून घ्या आजचे दर  title=

Petrol Diesel Price 5th February 2024 Marathi :  गेल्या काही दिवसापासून कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतारांचा कल कायम पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारात क्रूडची किंमत पुन्हा एकदा $80 च्या खाली गेली आहे. दरम्यान आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 5 फेब्रूवारीला सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्यात आला आहे.

तुम्ही जर गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असला तर आजचे पेट्रोल डीझेलच दर नक्की तपासा. आज महाराष्ट्रत पेट्रोल 106.36 रुपये प्रति लिटर ने विकले जाणार आहे. तर डिझेलचा किमतीत कमी झाल्या असून दिझेलसाठी 92.88 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटनुसार, नेहमीप्रमाणे आज इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबई आणि पुण्यातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाणून घ्या.

इतर शहरांमधील पेट्रोल डिझेलच्या किमती 

मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

पुण्यात पेट्रोल 106.38 रुपये आणि डिझेल 92.89 रुपये प्रति लिटर

ठाण्यात पेट्रोल रुपये 106.49 आणि डिझेल 94.45 रुपये प्रति लिटर

नाशिकमध्ये पेट्रोल 106.57 रुपये आणि डिझेल 93.07 रुपये प्रति लिटर

नागपूरमध्ये  पेट्रोल 106.23 रुपये आणि डिझेल 92.77 रुपये प्रति लिटर

कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.12 रुपये आणि डिझेल 92.67 रुपये प्रति लिटर

कच्चा तेलाच्या किमतीत घसरण

कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले तर, आज जागतिक बाजारात नरमाई दिसून येत आहे.  ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 77.58 डॉलरवर घसरली आहे. तर डब्ल्यूटीआयचा दरही आज घसरून प्रति बॅरल $72.43 वर आला. तर रविवारी कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 100 डॉलर्सच्या पुढे गेलेले कच्चे तेल आता 86 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहे. भारतीय पेट्रोलियम कच्च्या तेलाचे दर प्रचंड घसरत आहेत. कच्च्या तेलाच्या दरात घसरण होत असून भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर जाहीर केले आहेत. 

रोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 

पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर करण्यात येतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.