मुंबई : राज्यात जवळपास 3 आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्येत (Corona Updates In Maharashtra) घट कायम आहे. विशेष म्हणजे रुग्णसंख्येपेक्षा अधिक जण दिवसनिहाय कोरोनामुक्त होत आहेत. राज्यात गेल्या 24 तासात 8 हजार 470 नव्या कोरोना रुग्णांची (Covid 19) नोंद झाली आहे. तर एकूण 9 हजार 43 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. (Today June 22 2021 8 thousand 470 new corona patients have been found in Maharashtra)
राज्यातील रिकव्हरी रेट किती?
महाराष्ट्रात सातत्याने दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण कोरोनामुक्त होत आहे. याचा पॉझिटिव्ह परिणाम रुग्ण बरे होण्याच्या दरावर (Recovery Rate) होत आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर हा 95.9 % इतका झाला आहे. राज्यात एकूण 1 लाख 23 हजार 340 सक्रीय रुग्ण आहेत.
दिवसभरात मृत्यू किती?
कोरोनामुळे मृत होणाऱ्यांच्या संख्याही आज 200 पेक्षा कमी आली आहे. राज्यात आज कोरोनामुळे 188 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यदर 1.98 % इतका झाला आहे. सध्या राज्यात 6,58,863 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 4 हजार 196 व्यक्ती सस्थांतमक क्वारंटाईन मध्ये आहेत.
मुंबई-पुण्यात किती रुग्ण?
मुंबईतील कोरोनाबाधितांमध्ये कमालीची घट झाली आहे. 24 तासात फक्त 570 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर 742 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर हा 95 टक्के इतका झाला आहे. तर कोरोना दुप्पटीचा दर हा 722 दिवसांवर पोहचला आहे.
#CoronavirusUpdates
२२ जून, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण - ५७०
२४ तासात बरे झालेले रुग्ण - ७४२
बरे झालेले एकूण रुग्ण - ६९०४१७
बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९५%एकूण सक्रिय रुग्ण- १४४५३
दुप्पटीचा दर- ७२२ दिवस
कोविड वाढीचा दर ( १५ जून ते २१ जून)- ०.०९ % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 22, 2021
पुण्यात 220 नवे रुग्ण सापडले आहेत. 331 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर फक्त 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यातील मृतांची एकूण संख्या 8 हजार 542 इतकी झाली आहे.
पुणे कोरोना अपडेट : मंगळवार दि. २२ जून, २०२१
उपचार सुरु : २,३५४
नवे रुग्ण : २२० (४,७६,२१०)
डिस्चार्ज : ३३१ (४,६५,३१४)
चाचण्या : ४,८७८ (२६,२३,६६२)
मृत्यू : ५ (८,५४२)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/Sxpn682fxc— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 22, 2021
संबंधित बातम्या :
महाराष्ट्राची आणखी चिंता वाढली, या 6 जिल्ह्यात नव्या व्हायरसचे रुग्ण सापडले