पुणे : डीएसकेंना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांची तीन पथकं तैनात करण्यात आली आहेत. उच्च न्यायालयानं डीएसकेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळं डीएसकेंना कुठल्याही क्षणी अटक होणार आहे. आधीच तुमच्याबाबतीत निर्णय द्यायला उशीर झाल्याचं सांगत कोर्टानं डीएसकेंना खडे बोल सुनावलेत.
तसंच डीएसकेंमुळे गुंतवणूकदारांची माफी मागण्याची वेळ न्यायालयावर आली. उशीर झाल्यामुळे न्यायालयानं गुंतवणूकदारांची माफी मागितली. डीएसकेंचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिलेत. त्याचबरोबर बुलढाणा अर्बन बॅंकेलाही कोर्टानं फटकारलंय.
डीएसके यांची संपत्ती विकत घेऊन त्यांना १०० कोटी रुपये देण्याची तयारी बुलडाणा अर्बन बँकेनं दाखवली होती. पण मुळात जी संपत्ती डिएसके यांनी बुलढाणा अर्बन बॅंकेला सादर केली होती. ती सगळी संपत्ती आधीच महाराष्ट्र बॅंकेकडे गहाण होती. या प्रकरणाची पुढची सुनावणी 1 मार्चला होणार आहे.