Maharashtra Third Alliance : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलंय. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मविआसोबतच बिनसल्यानंतर मविआनं स्वबळावर निवडणूक लढवली होती. मात्र,आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी नवीन आघाडीची घोषणा केलीय. जे पक्ष मनोज जरांगेसोबत जातील, त्या पक्षांसोबत जाणार नाही, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतलीय... निवडणुकीसंदर्भात काही पक्षांची चर्चाही झाल्याचं आंबेडकर म्हणाले. तर खुल्या जागांवर आदिवासी उमेदवारांना निवडणुकीत असल्याचीही घोषणा आंबेडकरांनी केलीय. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांनी आदिवासी पक्षांची मोट बांधलीय.
गोंडवाना गणतंत्र पक्ष, आदिवासी गोड गवारी, आदिवासी माना समाज, आदिवासी जमात संघ, आदिवासी विद्यार्थी कृती समिती, भारत आदिवासी पक्ष, एकलव्य आघाडी, आदिवासी एकता परिषद आणि जयेश संघटना या पक्षासोबत आंबेडकरांनी आघाडी स्थापन केलीय.
प्रकाश आंबेडकरांनी नव्या आघाडीची घोषणा केली असतानाच छत्रपती संभाजी राजे,बच्चू कडू, राजू शेट्टीही तिसऱ्या आघाडीची तयारी करत आहेत. स्वराज पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे, प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे डॉ.राजरत्न आंबेडकर, भारतीय जवान किसान पक्षाचे नारायण अंकुशे छोट्या राजकीय पक्षांनी महायुती आणि मविआसोबतच जागा वाटपासाठी बोलणी सुरु केली आहे. मात्र, आधीच युती-आघाडीमध्ये तीन-तीन पक्ष असल्याने छोट्या पक्षांच्या वाट्याला कमी जागा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रमुख नेत्यांवर दबाव टाकण्यासाठी छोटे पक्ष विविध पर्याय अवलंबत आहेत. राज्यातील नवीन आघाडीच्या प्रयोगाला देखील याच नजरेतून पाहिलं जातंय. . विधानसभेला देखील ही आघाडी दिसून येते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.