राज्यात संपूर्ण प्रशासनाचा कारभार ठप्प, फाईल्सचा गठ्ठा साचतोय

The entire administration is at a standstill In Maharashtra  : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन आठवडा झाला. या काळात संपूर्ण प्रशासनाचा कारभार ठप्प आहे. 

Updated: Jul 5, 2022, 08:34 AM IST
राज्यात संपूर्ण प्रशासनाचा कारभार ठप्प, फाईल्सचा गठ्ठा साचतोय title=

मुंबई : The entire administration is at a standstill In Maharashtra  : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन आठवडा झाला. या काळात संपूर्ण प्रशासनाचा कारभार ठप्प आहे. एकनाश शिंदे यांच्या मंत्रिमंडळाची स्थापना अजून झालेली नाही. त्यामुळे फाईल्सचा गठ्ठा साचत चालला आहे. 

सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असला तरी मंत्रिमंडळ विस्तार होण्यास आणखी 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागेल अशी शक्यता आहे. त्यामुळे कोणतेही निर्णय होत नाही. त्यामुळे आता तातडीने मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप करण्याची गरज आहे. 

मुख्यमंत्री खात्याव्यतिरिक्त गृह, महसूल, अन्न आणि नागरी पुरवठा, नगरविकास, सहकार खात्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. प्रत्येक खात्यात जवळपास 50 हून अधिक फाईल्स या मंत्र्यांच्या सहीच्या प्रतिक्षेत पडून आहेत. 

दरम्यान, 1 एप्रिल2022 पासून जिल्हा नियोजन समितीमार्फत झालेल्या निधीवाटपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. सर्व डीपीडीसींमार्फत झालेल्या निधी वाटपास स्थगिती दिली आहे. महाविकास आघाडीने अखेरच्या काळात डीपीडीसी निधी वाटप केलं होतं. शिंदे सरकारने निधी रोखत सरकारला मोठा धक्का दिला आहे.