Virat Kohli Alibaug : अलिबागकर विराट कोहली, तब्बल इतके कोटी मोजत 8 एकरचा भूखंड खरेदी

अनेक पर्यटकांची पहिली पसंती ही अलिबागलाच (Alibaug) असते. भारतीय क्रिकेटपटूंचंही अलिबागवर असलेलं प्रेम जगजाहीर आहे.

Updated: Sep 1, 2022, 08:22 PM IST
Virat Kohli Alibaug : अलिबागकर विराट कोहली,  तब्बल इतके कोटी मोजत 8 एकरचा भूखंड खरेदी title=

प्रफुल्ल पवार, झी मीडिया, अलिबाग : अलिबाग, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेलं पर्यटन स्थल. अनेक पर्यटकांची पहिली पसंती ही अलिबागलाच (Alibaug) असते. भारतीय क्रिकेटपटूंचंही अलिबागवर असलेलं प्रेम जगजाहीर आहे. आतापर्यंत टीम इंडियाच्या (Team India) आजी-माजी अशा अनेक खेळाडूंनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केलीय. आता यात आणखी एका स्टार खेळाडूची भर पडलीय. टीम इंडियाचा स्टार खेळाडू (Virat Kohli Alibaug) विराट कोहलीने 8 एकरचा भूखंड खरेदी केलाय. (team india star cricketer virat kohli get 8 acres land in Alibaug on occasion of ganapati)

विराटने गणपतीच्या मुहूर्तावर अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. झिराड परिसरात ही 8 एकर हवेशीर जागा आहे. विराट या जागेवर  फार्महाऊस बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. विराटचा भाऊ विकासने गणेश चर्तुथीच्या पूर्वसंध्येला जागेचा व्यवहार पूर्ण केला. 

विराट आणि पत्नी अनुष्का शर्मा हे 6 महिन्यांपूर्वी झिराडला आले होते. त्यावेळेस या दोघांनी जागेची पाहणी केली होती. क्रिकेटच्या व्यस्त कार्यक्रमामुळे विराटला अलिबागमध्ये येऊन जागेचा व्यवहार पूर्ण करता येत नव्हता.

विराट सध्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी दुबईत आहे. त्यामुळे गणपतीच्या आदल्या दिवसाचा मुहूर्त साधत विकासने ‘अधिकारपत्र’द्वारे (Power of attorney) विराटसाठी व्यवहार पूर्ण केला.

जमीन खरेदी-विक्रीची कागदपत्रे अलिबागमध्ये सह दुय्यम निबंधक अश्विनी भगत यांच्याकडे नोंदणीकृत केली. या जमिनीची एकूण किंमत 19 कोटी 24 लाख 50 हजार रुपये इतकी आहे. विकास मंगळवारी निबंधक कार्यालयात उपस्थित राहून हा व्यवहार रजिस्टर केला. हा व्यवहार रियल इस्टेटमधील नावाजलेल्या समिरा हॅबिटॅट्स या कंपनीने केला.

अलिबागकर झालेले भारतीय खेळाडू

रवी शास्त्री, रोहीत शर्मानंतर आता विराटही अलिबागकर झालाय. उद्योजक, सिने कलाकारांबरोबरच क्रिकेटपटूंनाही अलिबागच्या निसर्गरम्य परिसराची भूरळ पडत आहे. रवी शास्त्रीने 10 वर्षांपूर्वीच अलिबागमध्ये घर बांधलंय. तर म्हात्रोळी-सारळ परिसरात रोहितने 3 एकरमधील फार्महाऊसचे काम चालू आहे, अशी माहिती बांधकाम करणाऱ्या अमित नाईक यांनी दिली.

याव्यतिरिक्त हार्दीक पंड्या, युजवेंदर चहल हेदेखील काही दिवसांपासून जागेचा शोध घेत अलिबागमध्ये पोहचले होते. यावरुन क्रिकेट, सिनेकलाकार, उद्योजकांची अलिबागला असणारी पसंती दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.