जळगावातील दिव्यांग ब्रम्हूच्या जिद्दीची कहाणी

वृद्ध आईसहीत पाच जणांच कुटुंब, केवळ 15 गुंठे जमीन, तीही पूर्णपणे अळूच्या पानांची शेती. ह्याच आळूच्या पानांची हातविक्री करत, जळगावातील लोण पीराचे ब्रम्हू पाटील शेतकरी अंपगात्वावर मात करत कुटुंबाचा आधारवड ठरलाय.. 

Updated: Dec 3, 2017, 04:25 PM IST
जळगावातील दिव्यांग ब्रम्हूच्या जिद्दीची कहाणी title=

विकास भदाणे, जळगाव : वृद्ध आईसहीत पाच जणांच कुटुंब, केवळ 15 गुंठे जमीन, तीही पूर्णपणे अळूच्या पानांची शेती. ह्याच आळूच्या पानांची हातविक्री करत, जळगावातील लोण पीराचे ब्रम्हू पाटील शेतकरी अंपगात्वावर मात करत कुटुंबाचा आधारवड ठरलाय.. 

वडील आणि भावाचे निधन झाल्यानंतर आई आणि वहिनी, पुतण्या-पुतणी अशी पाच जणांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी 35 वर्षाचा अपंग शेतकरी ब्रम्हू पाटीलवर पडली. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात लोणी पीर हे ब्रम्हूचं गाव. 15 गुंठे जमिनीत अळूच्या पानाची शेती करत डाव्या पायाने अपंग असलेल्या ब्रम्हू पाटीलने धडधाकट तरुणांसमोरही एक वेगळा आदर्श निर्माण केलाय. मजुरांच्या मदतीशिवय शेतातील काम करत ब्रम्हू पाटील अळूच्या पानाचं शेतात उत्पादन घेतात, चाळीसगावच्या आठवडे बाजारात जाऊन ते 3दिवस ते पानांची हातविक्री करतात. आणि हाच त्यांचा अर्थार्जनाचा आणि कुटुंब जगवण्याचा मार्ग आहे. 

सततची नापिकी, लहरी आणि बदलेलं निसर्गचक्र, डोक्यावर कर्जाचा डोंगर अशा दुष्टचक्रात पाय रोवून उभं राहणं शेतक-यांसाठी महाकठीण, त्यात एखादया अपंगानं शेती कसणं म्हणजे अश्यकपारच.. तरीही ब्रम्हूपाटीलन सर्व अडिअडणींवर मोठ्या जिद्दीने मात करत, अळूच्या पानांचे ब्रँड अँम्बेसिडर म्हणून नावारुपाला येत आहे. कुटुंब आणि ग्रामस्थांनाही त्यांच कौतुक वाटतंय. 

अळूच्या पानांपासून ब्रम्हू पाटील यांना वर्षाकाठी दीड लाखाचं उत्पादन मिळतं. त्यातून त्यांचा उत्तमरित्या उदरनिर्वाह चालतो. अलीकडं शेती परवडत नाही म्हणून शेतीला दोष देत बसणाऱ्यांची कमतरता नाही. त्या सगळ्यांनी एका पायानं अधू असलेल्या ब्रम्हू पाटलांच्या श्रमाची ही कहाणी निच्छितचं प्रेरणादायी आहे.