संप मागे घ्या, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिला हा शेवटचा इशारा

ST employees strike : संप सुरू (ST bus strike) राहिल्यास एसटी कर्मचाऱ्यांची अडचण वाढेल, असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.  

Updated: Nov 10, 2021, 01:48 PM IST
संप मागे घ्या, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिला हा शेवटचा इशारा title=
संग्रहित छाया

मुंबई : ST employees strike : संप सुरू (ST bus strike) राहिल्यास एसटी कर्मचाऱ्यांची अडचण वाढेल, असा इशारा राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला आहे. संपप्रकरणी भडकवणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन कर्मचाऱ्यांना राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनासाठी मंत्रालयाकडे जाताना भाजप नेते गोपीचंद पडळकर, किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही झाले तरी आम्ही मंत्रालयावर आंदोलन करणार, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांची ज्या काही मागण्या होत्या त्या मान्य करण्यात आल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जीआरही काढण्यात आला आहे. मात्र, संप सुरुच आहे. राज्य सरकारमध्ये कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यात यावे, अशी संपकरी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

सरकारकडून संपकऱ्यांना इशारा देण्यात आला आहे. संप सुरू राहिल्यास कामगारांची अडचण वाढेल. विलिनीकरणाची मागणी 1-2 दिवसांत होणार नाही, असे मंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आहे. विलिनीकरणाच्या मागणीसाठी समिती नेमली आहे. निलंबनाची कारवाई घाईत केलेली नाही. कारवाई करण्याची इच्छा नाही, संप मागे घ्यावा. जर कामावर हजर न झाल्यास पगारही होणार नाही, असा इशारा परब यांनी यावेळी दिला.

भाजप नेते गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी घेणार, असा सवाल परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला आहे. विरोधक एसटी कर्मचाऱ्यांना भडकविण्याचे काम करत आहेत, असा हल्लाबोल अनिल परब यांनी केला आहे.