Maharashtra News : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल आहे. मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाला आहे. अशातच राज्यातील इतर समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी धनगर समाजातील लोकही आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसत आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने संतापलेल्या धनगर समाजातील कार्यकर्त्याने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळला आहे.
सोलापुरात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर धनगर समाजाच्या वतीने भंडारा फेकण्यात आला आहे. सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात हा सगळा प्रकार घडला. धनगर आरक्षण कृती समिती सोलापूरच्या वतीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आला. धनगर आरक्षणासाठी सोलापुरात धनगर समाज आक्रमक झालेला आहे. धनगर समाजाच्या कृती समितीच्या दोन ते तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देताना हा प्रकार घडला आहे.
ज्या आंदोलकांनी माझ्यावर भंडारा उधळला. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल करू नका. त्यांच्यावर कारवाई करू नका असे आदेश मी दिले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, असे विखे पाटील यांनी म्हटले आहे.