सोलापुरात खंडणी मागणाऱ्या मनसे-भाजप कार्यकर्त्यांना अटक

Updated: May 27, 2018, 09:49 PM IST

सोलापूर : सोलापूरच्या करमाळ्यात काँट्रॅक्टराकडून खंडणी उकळणाऱ्या तीन राजकीय तालुका कार्यकर्त्यांविरोधात पोलिसानं खंडणीचा गुन्हा दाखल केलाय. यामध्ये संजय घोलप आणि अशपाक जमादार या मनसे कार्यकर्त्यांचा समावेश आहे तर भाजपचा माजी तालुका अध्यक्ष शशिकांत पवार यांचाही समावेश आहे.

या प्रकरणी मानसेच्या दोन्ही तालुका नेत्यांना अंतरिम जमीन मंजूर झाला असून, शशिकांत पवार याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजार केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केलीय.