'व्हीव्हीपॅट' मशिनमध्ये गडबड - नाना पटोले

Updated: May 27, 2018, 09:28 PM IST

भंडारा : ईव्हीएम तसेच प्रथमच लोकसभा निवडणुकीत वापरात येणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीनमध्ये गडबड असल्याचा आरोप महाराष्ट्र काँगेस उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय.

घड्याळ चिन्हावर बटन दाबल्यास मशीन हँग होत असल्याचे देखील त्यांनी आपल्या आरोपातून स्पष्ट केलंय. त्यामुळे निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या नियमाप्रमाणे ही निवडणूक व्हाव्ही असे त्यांनी एक पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले आहे.