15 तलवारी, 7 गुप्त्या , 7 चाकू आणि.... शस्त्रसाठा पाहून पोलिसही चक्रावले

पांढ-या रंगाच्या प्लास्टीकच्या पोत्यात 15 तलवारी, 7 गुप्त्या, 7 चाकू अशी घातक हत्यारे गुंडाळून ठेवली होती. 

Updated: Nov 15, 2022, 08:10 PM IST
15 तलवारी, 7 गुप्त्या , 7 चाकू आणि.... शस्त्रसाठा पाहून पोलिसही चक्रावले title=

प्रविण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : गोंदियात(Gondia) मोठा शस्त्रसाठा सापडला आहे. हा शस्त्रसाठा(weapons) पाहून पोलिसही हादरले आहेत. गोंदिया जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा पथकाने 15 तलवारी, 7 गुप्त्या , 7 चाकू एका व्यक्तीकडून हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे गोंदियात एकच खळबळ उडाली आहे.  

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. निर्मल शाळा जवळ रेलटोली येथे एक इसम बेकायदेशीर रित्या अवैध्य शस्त्रे बाळगून विकत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने याठिकाणी धाड टाकली. यावेळी येथे पांढ-या रंगाच्या प्लास्टीकच्या पोत्यात 15 तलवारी, 7 गुप्त्या, 7 चाकू अशी घातक हत्यारे गुंडाळून ठेवली होती. ही शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तीला पोलिसांना अटक केली आहे. 

चमकोरसीग स्वर्णसिंग सिंग (वय ५४ वर्ष) असे या व्यक्तीचे नाव आहे. सिंग हा पंजाब येथील राहणारा आहे. तपासादरम्यान सिंग याच्याकडे शस्त्र बाळगण्याबाबत कसलेही कागदपत्रे, परवाना नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ही हत्यारे त्याने कुठून आणली. ही शस्त्र तो कोमाल विकणार होता याबाबत पोलिस अधित तपास करत आहेत.