बाल दिनानिमित्त वसुंधरा वाहिनीवर छोटे आर. जे.

विद्याप्रतिष्ठान संचलित वसुंधरा वाहिनीवरून बाल दिनानिमित्त खास लहान मुलांच्या सहभागावर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाहिनीवरून विविध विशेष दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 13, 2017, 10:07 PM IST
बाल दिनानिमित्त वसुंधरा वाहिनीवर छोटे आर. जे. title=

बारामती : विद्याप्रतिष्ठान संचलित वसुंधरा वाहिनीवरून बाल दिनानिमित्त खास लहान मुलांच्या सहभागावर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाहिनीवरून विविध विशेष दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 

१४ नोव्हेंबर 'बालदिन' निमित्त परिसरातील विविध शाळांना सहभागी करून घेत लहान मुलांना रेडिओवरून बोलण्याची संधी, वाहिनीने उपलब्ध करून दिली आहे. या वेळी विद्यार्थांनी महापुरुषांची चरित्रे, समूह गीते, नाट्यछटा तसेच कविता सादर केल्या. सहभागी विद्यार्थ्यांचे सादरीकरण वसुंधरा वाहिनी ९०.४ या  रेडियोवरून दि १४ रोजी सकाळी ७ ते दु १ व सायं ३ ते ६ या वेळेत प्रसारित होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व ध्वनिमुद्रणाची प्रक्रिया समजून घेता यावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले गेले. वर्गामध्ये गायल्या जाणाऱ्या कविता, गप्पा-गोष्टी श्रोत्यांच्या पर्यंत पोहचाव्यात हा या कार्यक्रमाच्या संकल्पनेचा मुख्य हेतू आहे. असे वाहिनीचे केंद्रप्रमुख युवराज जाधव यांनी व्यक्त केले.

या उपक्रमासाठी राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल हायस्कूल बारामती, विद्याप्रतिष्ठानचे न्यू बालविकास मंदिर पिंपळी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग, झेनुबिया इंग्लिश मिडीयम स्कूल बारामती या शाळा सहभागी झाल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य अभंग एस डी, सहाय्यक शिक्षिका एस एस काळभोर, प्राचार्या कल्पना बारवकर, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख माधुरी दीक्षित, मुख्याध्यापक अनिल खिलारे, मुख्याध्यापक सीमाताई जांगळे, प्राचार्या आय एम नासिकवाला व सहाय्यक शिक्षिका दीपा शेट्टी यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमांचे ध्वनिमुद्रण वाहिनीच्या निवेदिका स्नेहल कदम यांनी केले तर ध्वनी-संकलनाचे काम राजश्री आगम, ऋतुजा आगम व  प्रिया जाधव यांनी केले या उपक्रमासाठी माहिती व तंत्रज्ञान विभाग संचालक डॉ अमोल गोजे यांनी मार्गदर्शन केले.