परभणीत मुस्लिम समाजाचा मूक मोर्चा

म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात भारत सरकारने ठोस निर्णय घेऊन त्यांना मदत करावी, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डात सरकारने कोणतेही हस्तक्षेप करू नये, मुस्लिम समाजाला ठरविल्या प्रमाणे आरक्षण दयावे, इतर अनेक मागण्यांसाठी आज परभणी शहरातून मुस्लिम समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 

Updated: Sep 10, 2017, 09:40 PM IST
परभणीत मुस्लिम समाजाचा मूक मोर्चा title=

परभणी : म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात भारत सरकारने ठोस निर्णय घेऊन त्यांना मदत करावी, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डात सरकारने कोणतेही हस्तक्षेप करू नये, मुस्लिम समाजाला ठरविल्या प्रमाणे आरक्षण दयावे, इतर अनेक मागण्यांसाठी आज परभणी शहरातून मुस्लिम समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 

हा मोर्चा दुपारी 2 च्या सुमारास ईदगाह मैदानावरून निघून शहरातील मुख्य रस्त्यावरून होत जिल्हाधिकारी कार्यालय वर धडकला. 

मोर्चा जिल्हा अधिकारी कार्यालयावर आल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले या वेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.