नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालायातल्या मुलांच्या मृत्यूमुळे आरोग्य विभागातला गोंधळ समोर आला आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयासह विभागातल्या वैद्यकीय अधिका-यांची निम्म्याहून अधिक पदं रिक्त आहेत.
महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गट अ मधली ६८ पैकी ३८ पदं भरलेलीच नाहीत. तर वर्ग २ मधली अ श्रेणीची २१, तर ब श्रेणीतली तीन पदं रिक्त आहेत. शिवाय नाशिक जिल्हा रुग्णालयात विशेष डॉक्टरांची वानवा असल्यानं, मृत्यू होत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
एकंदरीत रामभरोसे चालत असलेला हा कारभार रुग्णांसाठी जीवघेणा ठरत आहे. माध्यमांनी हा सर्व प्रकार उघड केल्यानंतर, आरोग्यमंत्र्यांनी शनिवारी येऊन नाशिक जिल्हा रुग्णालयाला भेट दिली.