महाराजांबाबत आक्षेपार्ह बोलणारा श्रीपाद छिंदम 2000 मतांनी विजयी

या निकालाने अनेकांच्या भूवया उंचावल्या

Updated: Dec 10, 2018, 03:15 PM IST
महाराजांबाबत आक्षेपार्ह बोलणारा श्रीपाद छिंदम 2000 मतांनी विजयी title=

अहमदनगर : अहमदनगरचा वादग्रस्त माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम विजयी झाला आहे. श्रीपाद छिंदम आधीपासूनच आघाडीवर होता. छिंदम 2000 मतांनी विजयी झाला आहे. छिंदम याने भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी यांना केलं पराभूत. प्रभाग क्रं - 9 क मधून श्रीपाद छिंदमचा विजय झाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर छिंदम चर्चेत आला होता. त्याच्या विजयाने अनेकांना धक्का बसला आहे. मतदानाच्या दिवशी देखील मतदान यंत्राची पूजा केल्याप्रकरणी अहमदनगरचा वादग्रस्त माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमचा भाऊ श्रीकांत छिंदमवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी श्रीकांत छिंदम आणि त्याच्यासह सात ते आठ जणांवरगुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत छिंदमला पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे. श्रीकांत छिंदम वॉर्ड क्रमांक ९ मधून अपक्ष उमेदवार आहे.