नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज नागपूर दौऱ्यावर असून विदर्भातील शिवसेनेच्या संघटना बांधणीचा ते आढावा घेणार आहेत. विदर्भातील शिवसेनेचे मंत्री, आमदार, संपर्क प्रमुख आणि पदाधिकारी यांची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. आगामी काळात शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी यापूर्वीचं केली असून या पार्श्वभीमीवर शिवसेनेचं विदर्भातील संघटनात्मक बळ आणि नेत्यांचे मनोगत ठाकरे जाणून घेणार आहेत. शिवसेनेसमोर सद्यस्थितीत विदर्भात संघटना बळकट करण्याचं मोठं आव्हान आहे.
भाजपच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे दाखल झाले आहेत. भाजपसोबत युती न करण्याचा निर्णय उद्धव यांनी घेतलाय. त्यामुळे पक्ष बळकट करण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून ते विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा शिवसेना पक्ष प्रमुखांनी केली आहे. त्यासाठी विदर्भातील संघटनात्मक बळ व नेत्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी नागपुरात बैठक आयोजित करण्यात आलेय. शिवसेनेसमोर सद्यस्थितीत विदर्भात संघटना बळकट करण्याचे आव्हान आहे. त्यातच आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे याची तयारी शिवसेनेकडून आतापासून करण्यात येत आहे.