नवी दिल्ली : अयोध्येच्या मातीतील कारसेवकांच्या त्यागाचा गंध विसरणारे रामद्रोहीच असा टोला शिवसेनेचे मुखपत्र सामनातून लगावण्यात आलायं. कोट्यवधी हिंदुंचे संघर्ष, त्याग, रक्त आणि बलिदानातून आजचे राममंदिर उभे राहीले आहे. पंतप्रधान आज इथे पहिली कुदळ मारतील. बाबरीच्या पतनाने संघर्ष संपलाय. त्यामुळे राम मंदिर उभारणीचे राजकारण कोणी करु नये असे देखील सामनातून म्हटलंय.
राम मंदिर निर्माणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक कोटी रुपये राम मंदिर ट्रस्टला दिले. शिवसैनिकांना घेऊन त्यांनी अयोध्या वारी देखील केली होती. दरम्यान राम मंदीर भुमिपुजनाच्या निमंत्रण पत्रिकेतून ठाकरेंना वगळण्यात आलं. बाबरी मशिद पाडली तेव्हा उत्तर प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री कल्याणसिंग यांनी राजीनामा देत सरकारवर पाणी सोडले. ते आजच्या सोहळ्याला सुवर्ण मंचावर नाहीत याची आठवण सामनातून करुन देण्यात आली.
न्यायमुर्ती रंजन गोगोई विशेष निमंत्रितांमध्ये दिसायला हवे होते पण कुठे दिसत नाहीत. राम मंदिर निर्माणासाठी विश्व हिंदू परिषद, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाठीवर लाठ्या खाल्ल्या. गोळीबाराला तोंड दिलं, हौतात्म पत्करल्याची आठवणं देखील करुन देण्यात आली. न्यायालयात राममंदिर विरोधी ३० वर्षे लढा लढणाऱ्या मुस्लिम पक्षकार इक्बाल अन्सारी याला पहिलं निमंत्रण पाठवण्यात आलं.
राम जन्मभुमि सोहळा हा हिंदूचा आहे पण आता तो व्यक्ती केंद्रीत आणि राजकीय पक्ष केंद्रीत झालाय अशी टीका करण्यात आली. रामजन्मभुमी सोहळ्याचे श्रेय दुसऱ्या कोणाला मिळू नये असे देखील शिवसेनेनं स्पष्ट केलंय.
यामध्ये १३५ संत-महंतांचा समावेश आहे. भूमीपूजनासाठी अयोध्येत सजावटीसोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी बॅरिकेट्स लावले आहेत. चार पेक्षा जास्त लोकांना बंदी आहे. या निमित्ताने उत्तर प्रदेश राज्यात काही ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. दीपोत्सवासाठी शरयू नदीचे घाट सुशोभित करण्यात आला आहेत. प्रभू राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रमासंदर्भात 'झी २४ तास'वर आज दिवसभर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.