पर्यटक कर मागितल्यामुळे शिवसेना आमदाराची मारहाण

शिवसेनेच्या आमदाराच्या गुंडगिरीची घटना साताऱ्यात घडली आहे.

Updated: May 28, 2017, 09:12 AM IST
पर्यटक कर मागितल्यामुळे शिवसेना आमदाराची मारहाण title=

महाबळेश्वर : शिवसेनेच्या आमदाराच्या गुंडगिरीची घटना साताऱ्यात घडली आहे. महाबळेश्वरमध्ये पर्यटक कर मागितल्याच्या कारणावरुन शिवसेनेचे अणुशक्तीनगरचे आमदार तुकाराम काते यांनी वनसमितीच्या कार्यकर्तांना मारहाण केलीये.

आमदार तुकाराम काते हे महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी आले होते. त्यांची गाडी वेण्णा लेक येथील चौकात अडवली. ते आमदार आहेत हे वनसमितीच्या कार्यकत्यांना महिती नव्हते. त्यामुळे वनसमितीच्या कार्यकर्त्यांनी इतरांप्रमाणे आमदार काते यांच्याकडेही पर्यटन कर मागितला.

पर्यटन कर मागितल्याच्या कारणावरुन आमदार काते यांनी गाडीतून उतरुन वनसमितीच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी मोठी बाचाबाचीही झाली. धक्कादायक बाब म्हणजे महाबळेश्वर पोलिस ठाण्यात आमदाराविरोधातील वनसमितीच्या कार्यकर्त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. त्याउलट, वनसमितीच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हा दाखल करण्यात आलाय.