गणेशोत्सवासाठी 'तेजस' फूल्ल

कोकण रेल्वेवर सुरु झालेल्या नव्या तेजस एक्स्प्रेसला गणेशोत्सवाच्या काळात मागणी चांगलीच वाढलीये.

Updated: May 28, 2017, 08:20 AM IST
गणेशोत्सवासाठी 'तेजस' फूल्ल title=

मुंबई : कोकण रेल्वेवर सुरु झालेल्या नव्या तेजस एक्स्प्रेसला गणेशोत्सवाच्या काळात मागणी चांगलीच वाढलीये. 25 ऑगस्टला गणेशचतुर्थी आहे. कोकण रेल्वेवर गणेशोत्सवाच्या काळात इतर गाड्या फुल्ल असताना तेजसची 546 तिकीटं उपलब्ध आहेत. मात्र 23 ऑगस्टची 'तेजस'च्या सर्व तिकिटे बुक झालीत.

या दिवशीची वेटींग लिस्टही 145च्या वर पोहोचलीये. तेजसची 21 ऑगस्टची  ऑगस्टची तिकीटं अद्याप उपलब्ध झालेली नाहीत. मात्र ही तिकीटंही आठ ते दहा दिवसांत संपतील असा दावा रेल्वेप्रशासनानं केलाय.

गौरी गणपतीच्या काळात खासगी लक्झरी बसेसचे दर दामदुपटीने वाढलेले असतात. त्या तुलनेत तेजसचे तिकीट किफायतशीर असल्याचा बोललं जातंय.  त्यामुळे तेजसला कोकणवासीय अधिक पसंती देतील असा दावा रेल्वे प्रशासनानं केलाय.