Shiv Jayanti 2023 Wishes in Marathi: सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा, 'अशा' द्या जयंतीच्या खास शुभेच्छा

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : आज (19 फेब्रुवारी 2023) सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती साजरी होत आहे. तुम्हाला आज शिवजयंती निमित्त शुभेच्छांचा वर्षाव करायचा असेल खालीलप्रमाणे शुभेच्छा देऊन उत्सव साजरा करू शकता...

Updated: Feb 19, 2023, 08:34 AM IST
Shiv Jayanti 2023 Wishes in Marathi: सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा, 'अशा' द्या जयंतीच्या खास शुभेच्छा  title=

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: संपूर्ण राज्यभर  छत्रपती शिवरायांची 393 वी जयंती साजरी केली जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रेमी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात शिवजयंती (Shiv Jayanti) सोहळा साजरा करणार आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारकडून तारखेनुसार 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. सर्वांना जयंती निमित्त शुभेच्छा देतांना काही खास बोलावे वाटते तेव्हा तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा संदेश... अशावेळी तुम्ही मराठमोळी शुभेच्छापत्रं, Greetings, Wishes, Messages, WhatsApp Status, Stickers, GIFs शेअर करत हा आनंद द्विगुणित करू शकता. 

निश्चयाचा महामेरु,
बहुत जनांसी आधारु, 
अखंड स्थितीचा निर्धारु, 
श्रीमंत योगी, 
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 

जन्मदिन शिवरायांचा, 
सोहळा मराठी अस्मितेचा,
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 

 वाचा: छत्रपती शिवाजी महाराजांची आज 393 वी जयंती, शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा 

"जगातील एकमेव राजा असा आहे
ज्याचा जन्म आणि मृत्यू किल्ल्यावरच झाला,
तो राजा म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज.
शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..."

"कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा,
कोणी दुखावले असेल तर त्याला सुखाची वाट दाखवा,
जग जिंकायचं असेल तर उदाहरण शिवाजी महाराजांचे द्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा"

"यशवंत, किर्तीवंत,
सामर्थ्यवंत, वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत,
जाणता राजा, छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा"

"सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा." 

जिथे शिवभक्त उभे राहतात,
तिथे बंद पडते भल्या भल्यांच्या मती,
अरे मरणाची कुणाला भीती,
आदर्श आमचे राजे शिवछत्रपती

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!

देवा जन्म दिला जरी पुढील आयुष्यात,
तरी एक फूल म्हणून जन्माला येऊ दे,
आणि त्या फूलाची जागा माझ्या राजाच्या पायावर असू दे
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. तथापि, त्याच्या जन्माबद्दल इतिहासकारांमध्ये नेहमीच मतभेद राहिले आहेत. काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की त्यांचा जन्म 1630 मध्ये झाला होता, तर काहींच्या मते त्यांचा जन्म 1627 मध्ये झाला होता. शिवाजीचे वडील शहाजी भोसले हे अहमदनगर सल्तनतमध्ये सैन्यात सेनापती होते. त्यांची आई जिजाबाई या स्वतः एक योद्धा होत्या पण त्यांना धार्मिक ग्रंथांमध्येही खूप रस होता. त्यांच्या या धार्मिक आवडीमुळे त्यांनी लहान वयातच महाभारत ते रामायण ते शिवाजी असे धार्मिक ग्रंथ शिकवले होते.

लहानपणापासूनच शिवाजी धार्मिक ग्रंथ ऐकत मोठे झाले, त्यामुळे त्यांच्यात सत्ताधारी वर्गाच्या क्रूर धोरणाविरुद्ध लढण्याची ज्योत जागृत झाली. तसेच महाराष्ट्रात 1869 साली रायगडावरील शिवरायांच्या समाधींचा शोध लागल्यानंतर पुढील वर्षापासून ज्योतिबा फुले यांनी शिवजयंती साजरी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर स्वातंत्र्यचळवळीमध्ये लोकांना एकत्र आणण्यासाठी बाळ गंगाधर टिळक यांनी शिव जयंती साजरी केली आणि नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील शिवजयंती साजरी केल्याचे इतिहासात दाखले आहेत.