मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'त्या' निर्णयाने नाराजी, शिवसंपर्क अभियानाची येथे 'कोंडी'

 Chief Minister Uddhav Thackeray's refinery project decision : बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातही शिवसेनेत (Shiv Sena) कमालीची नाराजी पसरली आहे.  

Updated: Apr 5, 2022, 12:54 PM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'त्या' निर्णयाने नाराजी, शिवसंपर्क अभियानाची येथे 'कोंडी' title=

रत्नागिरी : Chief Minister Uddhav Thackeray's refinery project decision : बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातही शिवसेनेत (Shiv Sena) कमालीची नाराजी पसरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्प (refinery project) राजापूर जिल्ह्यात बारसू इथे होण्यासंबंधी पंतप्रधानांना पत्र लिहिल्यामुळे शिवसेनेतील कार्यकर्ते आणि स्थानिक नेते कमालीचे नाराज झालेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना विश्वास घेतले नाही, अशी भावना आहे. बारसू, सोलगांव, देवाचे गोठणे, गोवळ आणि शिवणे खुर्द या गावांमध्ये शिवसंपर्क अभियान न राबवण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांनी घेतला आहे. 

सध्या या ठिकाणी नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. प्रकल्पाला सूचविल्या गावात आणि त्याठिकाणी गेल्यास एखादा गंभीर प्रकार घडण्याची शक्यता असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. आगामी काळात शिवसेनेत मोठी गळती होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.