शिर्डी लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?

साईनगरी शिर्डी मतदारसंघातली राजकीय हवा काय सांगतेय. २०१९ ला तिथे काय घडेल.पूर्वीचा

Updated: Jun 25, 2018, 11:25 AM IST
शिर्डी लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार? title=

प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी : साईनगरी शिर्डी मतदारसंघातली राजकीय हवा काय सांगतेय. २०१९ ला तिथे काय घडेल.पूर्वीचा कोपरगाव आणि आत्ताच्या शिर्डी लोकसभा मतदार संघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिलंय. दिवंगत काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी या मतदार संघाचं 9 वेळा  खासदार म्हणून  प्रतिनिधित्व केलंय.  मतदारसंघ फेररचनेत  शिर्डी हा लोकसभा मतदारसंघ  अनुसुचीत जातीं साठी राखीव झाला. त्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी रामदास आठवलेंना हरवलं.  

शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा पुर्वी कोपरगाव मतदार संघ म्हणून ओळखला जात असे. मतदार संघाच्या पुर्नरचेने नतर याचे नाव शिर्डी लोकसभा मतदार संघ झालं. विखेंनी एकदा शिवसेनेतून या मतदारसंघात निवडणूक लढवली...आणि निवडूनही आले. पण विखेंनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा खासदार झाले. 

2009च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठींब्याने आर पी आय चे अध्यक्ष रामदास आठवले आणि शिवसेनेचे उमेदवार म्हणुन भाऊसाहेब वाकचौरे यांनी पहिल्यांदाच निवडणुक लढवली होती ,त्यात १ लाख मतांनी आठवलेंचा पराभव झाला होता. त्यात  गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत शिवसेनेचे उमदेवार सदाशीव लोखंडे यांनी अवघ्या पंधरा दिवसाचा प्रचार करुन विजयश्री मिळवली होती. 

मोदी लाट आणि माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा काँग्रेस प्रवेश हे या निवडणुकीतलं महत्वाचं कारण होतं. 

गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर या मतदार संघात येणाऱ्या अकोले. संगमनेर,शिर्डी,कोपरगाव, श्रीरामपुर,नेवासा या मतदार संघात आधी शिवसेना भाजपला विशेष स्थान मिळत नव्हतं. 

मात्र मोदी लाटे नंतर राधाकृष्ण विखे पाटलांच्या मतदार संघातील महत्वाची अशी राहाता नगर पालीका मात्र भाजपाच्या हातात आलीय. त्याच बरोबरीने अनेक ग्रामपंचायती मध्येही युतीचे अऩेक सदस्य निवडून आलेत.  दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रावादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील मात्तबरांनी आप आपल्या मतदार संघात आपल वर्चस्व टिकवुन ठेवलय.

शिर्डी लोकसभा मतदार संघातल्या समस्या ४ वर्षांत मिटल्यायत का..?

पाहुयात एक रिपोर्ट..... 

शिर्डी लोकसभा मतदार संघात  सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो पाणी प्रश्न. निळवंडे धरणाचं काम आणि त्यातून सिंचनासाठी उपलब्ध होणारं पाणी हा प्रश्न नेहमीच चर्चेत राहतो.... राज्य सरकाच्या निधीनं धरणाचं काम तर आता पूर्ण झालंय. मात्र कालव्यांची कामं अजून शिल्लक आहेत. या धरणाला आता केंद्रीय जल आयोगाची तांत्रिक मान्यता मिळालीय.  
या कामावरुनही आता श्रेयाची लढाई सुरू झालीय. 

खासदार सदाशिव लोखंडे यांचा निळवंडे धरणासाठी केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळवून आणण्यात मोठा वाटा आहे. त्याबरोबरच दौंड मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरी करणाची जुनीच मागणी या खासदारांच्या कार्य काळात पूर्ण झालीय.   

सदाशीव लोखंडेचा हा मुळचा मतदार संघ नसल्यानं  मतदार संघात स्वतःचं संघटन नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत सदाशिव लोखंडेना  पक्षांतर्गत प्रबळ दावेदार म्हणुन बबनराव घोलपांचं नाव चर्चेत आहेत.  लोकसभा निवडणुकीत जर भाजपा सेनेची युती झाली तर शिर्डीची जागा ही शिवसेनेकडे आहे त्यामुळे सध्या भाजपाच्या तंबुत असलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांची मात्र मोठी अडचण होणार आहे. त्या मुळे त्या वेळी त्यांचा पक्ष कोणता हे महत्वाचं आहे. 

काँग्रेस राष्ट्रवादीक़डून अजून कुठलाही चेहरा समोर आलेला नाही. मतदार संघातील वजनदार नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी नगर लोकसभा लढविण्याची जोरदार तयारी केली आहे. मात्र ती जागा राष्ट्रवादी कडे असल्याने एन वेळी जागा वाटपात नगरची जागा काँग्रेसला आणि शिर्डीचे जागा राष्ट्रवादीला अशी अदला बदल झाल्यास शरद पवार शिर्डी मतदार संघातुन पवार कोणाला संधी देतात हे पहाणे महत्वाच ठरणार आहे.याच बरोबरीने या मतदार संघातुन रामदास आठवले पु्न्हा निवडणूक लढविणार अशी चर्चा ही सुरु आहे.