साईबाबांच्या दरबारात पैशाचा पाऊसच, ४ कोटी ३३ लाखांची तिजोरीत भर

साईबाबांच्या दरबारातील उत्सवाची रोकड मोजणी म्हणजे पैशाचा पाऊसच असतो. प्रत्येक उत्सवात दानाचे मागील सर्व रेकॉर्ड मोडीत निघतात. यंदाच्या रामनवमी उत्सवात ही भाविकांनी भरगच्च दान केलंय.  यावेळी४ कोटी ३३ लाख रुपयांची सांईंच्या तिजोरीत भर पडलीय. 

Updated: Mar 27, 2018, 11:32 PM IST
साईबाबांच्या दरबारात पैशाचा पाऊसच,  ४ कोटी ३३ लाखांची तिजोरीत भर  title=

शिर्डी : साईबाबांच्या दरबारातील उत्सवाची रोकड मोजणी म्हणजे पैशाचा पाऊसच असतो. प्रत्येक उत्सवात दानाचे मागील सर्व रेकॉर्ड मोडीत निघतात. यंदाच्या रामनवमी उत्सवात ही भाविकांनी भरगच्च दान केलंय.  यावेळी४ कोटी ३३ लाख रुपयांची सांईंच्या तिजोरीत भर पडलीय. 

यंदाच्या रामनवनी उत्सवात तीन लाख भाविकांनी साई समाधीचं दर्शन घेतलं. मंदिरात स्थित दानपेटीत १ कोटी ९८ लाख ९६ हजार रुपये तर देणगीकक्षात ७१ लाख ६४ रुपये जमा झाले. ८७ लाख ६४ हजार रुपयांचं सोनं तर ७८ हजार रुपये किंमतीची चांदी या उत्सवात आलीय.