सांगली : संभाजी भिडे गुरुजी यांच्या समर्थ शिवप्रतिष्ठानकडून उद्या महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी शहरात संचलन केलं. या संचलनात ८५० पोलीस सहभागी झाले होते. शिवप्रतिष्ठानचा मोर्चा ज्या मार्गावरून निघाणार आहे त्या मार्गावरून हे संचलन करण्यात आले.
दरम्यान कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी संभाजी भिडे यांना क्लीनचिट दिल्याबद्दल शिवप्रतिष्ठानने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेत. संभाजी भिडे यांच्या पाठिशी राहिल्याबद्दल जनता आणि विविध संघटनांचे शिवप्रतिष्ठानने आभार व्यक्त केलेत. संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणीही शिवप्रतिष्ठाननं केलीय.