पुण्यात आज पवार-ठाकरे यांची जुगलबंदी

 ठाकरे - पवार या ऐतिहासिक मुलाखतीची जोरदार तयारी सुरू आहे. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 21, 2018, 02:02 PM IST
पुण्यात आज पवार-ठाकरे यांची जुगलबंदी title=

पुणे : आज होणाऱ्या ठाकरे - पवार या ऐतिहासिक मुलाखतीची जोरदार तयारी सुरू आहे. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. 

ठाकरे आणि पवार कुटुंबीयांचे फार जुने संबंध आहेत. तसंच राजकारणात विरोध नैतिकतेचा असतो वैयक्तीक कधीच नसतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी मुलाखत घेणार आहेत. याबाबत विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.

पवार-ठाकरे यांच्या मुलाखतीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या मुलाखतीचे झी २४ तासवर थेट प्रक्षेपण सायंकाळी ५ वाजता दाखविण्यात येणार आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच एक दुर्मिळ योग येणार आहे. त्याचा याचि देही याचि ड़ोळा साक्षीदार होण्याचं भाग्य पुणेकरांना लाभतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेणार आहेत.

राज ठाकरेंचे मिश्कील प्रश्न आणि पवारांची त्यावर दमदार बॅटिंग असा सामना बीएमसीसी मैदानात रंगणार आहे.... ठाकरे आणि पवारांचे हे सवाल जबाब तुम्हाला झी 24 तासवर पाहायला मिळणार आहेत.  त्यामुळे तुमची आज संध्याकाळी पाच वाजता झी 24 तासबरोबरची अपोईन्टमेंट नक्की करुन ठेवा.