Gold Silver Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घट झाल्यानंतर वायदे बाजारातही सोन्याचे दर घसरले आहेत. आज भारतातही सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे समोर आले आहे. आज सोन्याच्या दरात किती घसरण झाली आहे ही जाणून घेऊया.
ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याच्या दरात किंचितशी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय दरात 2700पर्यंत सोनं पोहोचलं होतं. चांदीच्या दरातही घसरण झाली होती. चांदी 30डॉलरपर्यंत पोहोचली आहे. MCXवर सोनं 110 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं सोनं 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 79,960 रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. तर चांदी 90,330 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली असून काल 90,513 रुपयांवर बंद झाली होती.
आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांची घसरण झाली आहे तर त्यामुळं प्रतितोळा सोनं 73,300 रुपयांवर पोहोचलं आहे. तर 22 कॅऱेट सोन्याच्या दरात 110 रुपयांची घसरण झाली असून सोनं 79,960 रुपयांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 90 रुपयांची घसरण झाली असून सोनं 59,970 रुपयांवर पोहोचलं आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 73, 300 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 79, 960 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 59,970 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,330 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7,968 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 997 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 58,640रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 63,968रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 47,976 रुपये
22 कॅरेट- 73, 300 रुपये
24 कॅरेट- 79, 960 रुपये
18 कॅरेट- 59,970 रुपये