क्रिकेट मैदानात शरद पवारांची पृथ्वीराज चव्हाणांना गुगली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी खेळाच्या मैदानातही आपली चुणूक दाखवली. पुण्यात सदू शिंदे क्रिकेट मैदानाच्या उदघाटनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी चेंडू हाती घेतला. 

Updated: Nov 27, 2018, 09:32 PM IST

पुणे : एरवी राजकीय आखाड्यात विरोधकांशी दोन दोन हात करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी खेळाच्या मैदानातही आपली चुणूक दाखवली. पुण्यात सदू शिंदे क्रिकेट मैदानाच्या उदघाटनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी चेंडू हाती घेतला. 

पवारांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना गोलंदाजी टाकली. पवारांनी टाकलेला एकही चेंडू पृथ्वीराज चव्हाणांना टोलवता आला नाही. मात्र एरवी राजकीय गुगलीसाठी प्रसिद्ध असलेल्या पवारांनी पृथ्वीबाबांना टाकलेली फिरकी ही चर्चेचा विषय मात्र झाली. 

तर आज पवार कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तलवारबाजीची चुणूक दाखवली. पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या, रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं एस. एम. जोशी महाविद्यालयात मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. यावेळी प्रशिक्षकांसह सुप्रियाताईंनी तलवारबाजीचे दोन हात केले.