Sharad Pawar: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना आलेल्या ईडीच्या नोटीसवर देखील भाष्य केलं. 

Updated: May 11, 2023, 04:36 PM IST
Sharad Pawar: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... title=
Sharad Pawar On Supreme Court verdict

Sharad Pawar On Supreme Court verdict : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांनी देशातील सर्व विरोधकांच्या वज्रमुठीवर भाष्य केलंय. त्यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना आलेल्या ईडीच्या नोटीसवर देखील भाष्य केलं. 

काय म्हणाले शरद पवार?

लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र काम करण्याची गरज आहे, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. विरोधकांची मोळी बांधण्याची गरज आहे. महाराष्ट्रात देखील एकत्र काम करण्याची गरज आहे. ठाकरेंच्या राजीनाम्यावर चर्चेची गरज नाही, आत्ता चर्चा नको, असंही शरद पवार म्हणाले आहे.

अध्यक्षांनी नियमांच्या चौकटीत राहून काम करायचं असतं. ठाकरेंच्या राजीनाम्याविषयी मी पुस्तकात लिहिलं आहे. मी पुस्तकात आपलं मत मांडल्याने काही मित्र नाराज झाले. मात्र, मूळ राष्ट्रीय पक्षाच्या सूचनेने लोक निवडणूक लढवतात, निवडून येतात, त्या पक्षाचा आदेश हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता अध्यक्ष याबाबत काय भूमिका घेतात ते स्पष्ट होईल. त्याआधी आम्ही भाष्य करणं योग्य ठरणार नाही, असं म्हणत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना लगावला. नैतिकता आणि भाजप यांचा काही संबंध आहे, असं मला वाटत नाही, असं रोखठोक वक्तव्य शरद पवार यांनी यावेळी केलं आहे. महाविकास आघाडी अधिक जोमानं काम करणार. राज्यपालांची भूमिका चुकीचीच होती. राज्यकर्त्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयाने तीव्र भूमिका बांधली, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

ईडीच्या नोटीसवर पवार म्हणतात...

जयंत पाटलांना आलेल्या ईडीच्या नोटीसवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्तेचा सात्त्याने गैरवापर केला जात आहे, असं म्हणत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच माझा महाराष्ट्र दौरा सुरूच राहिल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

नितीश कुमार काय म्हणाले?

भाजप जे करतंय ते देशहिताचं नाही. शरद पवार विरोधकांचा चेहरा झाले तर आनंदच आहे. कर्नाटकात सेक्युलर सरकार येईल, असं नितिश कुमार यावेळी म्हणाले आहे.

आणखी वाचा - Maharastra Politics: 'व्हीप' म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या सोप्या भाषेत!

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याच्या निर्णयावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षांनी मिळून निर्माण केलं होतं. राजीनाम्याचा निर्णय घेताना अन्य सहकारी पक्षांशी संवाद साधणं आवश्यक होतं, त्याचे परिणाम दिसून येतील, असं शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर म्हटलं होतं. त्यानंतर आता शरद पवाराचे ते शब्द खरे ठरल्याचं पहायला मिळतंय.