लोकसभेसाठी शांतिगिरी महाराजांनी स्वत:च केली उमेदवारी जाहीर

औरंगाबाद लोकसभेसाठी औरंगाबादच्या शांतिगिरी महाराजांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केलीये. मात्र, यावर भाजप मूग गिळून गप्प आहे. 

Updated: Jan 22, 2018, 12:26 PM IST
लोकसभेसाठी शांतिगिरी महाराजांनी स्वत:च केली उमेदवारी जाहीर  title=

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभेसाठी औरंगाबादच्या शांतिगिरी महाराजांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केलीये. मात्र, यावर भाजप मूग गिळून गप्प आहे. 

शांतिगिरी महाराजांची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी, निवडणूक भाजप कडून लढणार असल्याचे शांतिगिरी महाराज म्हणाले. काही दिवसांपूर्वी भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी शांतिगिरी महाराज यांची भेट घेतली होती. त्यामुळं शांतिगिरी भाजपचे लोकसभेचे उमेदवार असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यात आता शांतिगिरी महाराजांनी घोषणा केल्याने, ते निवडणूक लढवणार हे नक्की झाले आहे. 

भाजप गप्प

पण भाजप मात्र सध्या यावर काहीही बोलायला तयार नाही. शांतिगिरी महाराजांचे सध्याचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या समोर मोठं आव्हान असू शकत, 2009 च्या निवडणुकीत हि शांतिगिरी महाराज अपक्ष म्हणून लढले होते आणि लाखभर मत मिळवत खैरे ला चांगलेच झुंजवले होते, त्यात महाराजांनी आताच घोषणा करणे म्हणजे खैरे ना सुद्धा आता पासूनच कामाला लागवे लागणार आहे.