कोल्हापूर : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करून चर्चेत आलेल्या करुणा शर्मा यांनीही कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र...
कोल्हापुरच्या निवडणुकीत करुणा शर्मा यांनी उडी घेतली. शिवशक्ती सेनेच्या तिकीटावर त्या निवडणूक लढवत आहेत.
१३ कोटी जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची माझी इच्छा आहे. महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणावर काम करणार असल्याचं त्या म्हणाल्या होत्या.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीसाठी आज होत असलेल्या मतमोजणीत करुणा शर्मा याना मिळालेली मते पहाता त्यांची वाटचाल कोणत्या दिशेने सुरु आहे हे स्पष्ट होतंय.
कॉंग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्यातच खरी चुरस आहे.
आत्तापर्यंत झालेल्या ११ फेऱ्यांमध्ये शिवशक्ती सेनेच्या उमेदवार करूणा धनंजय मुंडे यांना अवघी ६१ मते मिळाली आहेत.