कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांची वाटचाल विजयाच्या दिशेने सुरु झाली आहे. आठव्या फेरीतही जयश्री जाधव यांनी मतांची आघाडी घेतलीय. त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्या महिला आमदार तसेच नगरसेवक असताना महापौर होण्याचा असा दुहेरी मान मिळविणाऱ्या त्या पहिल्या आमदार ठरणार आहेत.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीत आघाडी घेणाऱ्या उमेदवार जयश्री जाधव यांनी माध्यमांशी बोलताना, 'विजय निश्चित आहे. पण, आज अण्णा सोबत नाहीत याची खंत आहे. त्यांची पावलोपावली आठवण येते. कोल्हापूरच्या जनतेने त्यांच्या माघारी त्यांचे स्वप्न पूर्ण केले. अण्णांनी जे पेरलं ते चांगलं उगवलं.' असे सांगता त्या भावुक झाल्या होत्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर आणि माझ्या जनतेला माझ्या विजयाचे श्रेय देईन. जनतेने भरभरून मते दिल्याबद्दल सर्वांची आभारी आहे. याचे श्रेय महाविकास आघाडीला आहे. कोल्हापुरच्या स्वाभिमान जनतेने न्याय दिला आहे. या निवडणुकीत भाजपचे संस्कार कमी पडलेत, असेही त्या म्हणाल्या.
एकूण २६ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पूर्ण होणार आहे. यापैकी ८ फेऱ्या आतापर्यंत पूर्ण झाल्या आहेत.
आठवी फेरी : काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव 9152 मतांनी आघाडीवर
जयश्री जाधव ( काँग्रेस ) - 33993
सत्यजित कदम ( भाजप ) - 24841
सातवी फेरी - काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव 9676 मतांनी आघाडीवर
जयश्री जाधव ( काँग्रेस ) - 31012
सत्यजित कदम ( भाजप ) - 21336
सहाव्या फेरीअखेर काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव 8475 मतांनी आघाडीवर
जयश्री जाधव ( काँग्रेस ) - 27170
सत्यजित कदम ( भाजप ) - 18701
पाचव्या फेरीअखेर काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव 6758 मतांनी आघाडीवर
जयश्री जाधव ( काँग्रेस ) - 22481
सत्यजित कदम ( भाजप ) - 15729
चौथ्या फेरीअखेर काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव 7273 मतांनी आघाडीवर
जयश्री जाधव ( काँग्रेस ) - १८८०८
सत्यजित कदम ( भाजप ) - ११५३१
तिसऱ्या फेरीअखेर काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव 7501 मतांनी आघाडीवर
जयश्री जाधव ( काँग्रेस ) - 15099
सत्यजित कदम ( भाजप ) - 7594
दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांची 3002 मतांची आघाडी
जयश्री जाधव ( काँग्रेस ) - १०३७१
सत्यजित कदम ( भाजप ) - ५२३२
पहिल्या फेरीअखेर काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांची २१३७ मतांची आघाडी
जयश्री जाधव ( काँग्रेस ) - ४८५६
सत्यजित कदम ( भाजप ) - २७१९