डोक्यावर हिजाब आणि हातात भगवा! राम मंदिर सोहळ्यासाठी मुंबईहून अयोध्येला पायी निघाली मुस्लिम तरुणी

देशभरात अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु आहे. अनेक जण अयोध्येला निघाले आहेत. मुंबईहून एक मुस्लीम तरुणी देखील पायी चालत अयोध्येला निघाली आहे. 

Updated: Dec 25, 2023, 05:15 PM IST
डोक्यावर हिजाब आणि हातात भगवा! राम मंदिर सोहळ्यासाठी मुंबईहून अयोध्येला  पायी निघाली मुस्लिम तरुणी title=

Ram Mandir Inauguration : अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा पूजा करण्यात येणार आहे. संपूर्ण देशवासीय या सोहळ्याची अतुरतेने वाट पाहत आहेत. अनेकांनी अयोध्येला जाण्याची तयारी देखील सुरु केली आहे. अशातच एक मुस्लिम तरुणी राम मंदिर सोहळ्यासाठी मुंबईहून अयोध्येला पायी चालत निघाली आहे.  डोक्यावर हिजाब आणि हातात भगवा घेऊन या तरुणीची पदयात्रा सुरु आहे. 

अयोध्या येथे 22 जानेवारीला प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.  या सोहळ्यासाठी देशभरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेय. या सोहळ्याच्या निमित्ताने एक मुस्लिम युवती आपल्या दोन मित्रांसह मुंबई येथून पायी निघाली असून, अयोध्येला जात आहे. त्यांच्या पद यात्रेने पाच दिवसांचा प्रवास पूर्ण केला आहे. आता ते नाशिक येथून ते पुढे रवाना झाले. 

शबनम शेख असे या मुस्लिम तरुणीचे नाव आहे. रमनराज शर्मा आणि बिनित पांडे अशी तिच्या दोन मित्रांची नाव आहेत. रामायण बाबत ऐकत असल्याने प्रभू श्रीराम यांच्या बद्दल आस्था असल्याची प्रतिक्रिया मुस्लिम युवती शबनम शेख हिने दिली आहे. त्याचप्रमाणे अयोध्या येथे जाऊन प्रभू श्री रामचंद्र यांच्या बद्दल आणखी जाणून घेण्याची भावना तिने व्यक्त केली. जानेवारी महिन्यात होणाऱ्या या सोहळ्यासाठी संपूर्ण देशवासीयांना या तिघांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यात पुणेकरांचा शंखनाद 

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यात पुणेकरांचा शंखनाद ऐकू येणार आहे.. पुण्यातील केशव शंखनाद पथकाला या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय. एकीकडे श्रीरामांच्या मूर्तीचं वस्त्र हे खास पुण्यात बनतय तर दुसरीकडे केशव शंखनाद पथकातील तब्बल 111 वादक हे अयोध्येत जाऊन शंखनाद करणारेत.

अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेआधी मोदींचा रोड शो 

30 डिसेंबरलाच मोदी अयोध्येत दाखल होतील. अयोध्येतलं विमानतळ आणि रेल्वे स्टेशनचं उद्घाटन पंतप्रधान मोदी करतील. त्यामुळे 30 डिसेंबर ते 22 जानेवारीदरम्यानचे विविध कार्यक्रम पाहता अयोध्येत अभूतपूर्ण सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीय. 22 जानेवारीला अयोध्येच्या बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी असेल.. फक्त आमंत्रितांनाच प्रवेश दिला जाईल.. प्रशासनाकडून दररोज सुरक्षेचा आढावा घेतला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत ऐतिहासिक रोड शो होणार आहे.. अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेआधी मोदींचा रोड शो होईल.. या रोड शोमध्ये स्वस्ति वाचन तसंच शंखध्वनी करत मोदींवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे.  अयोध्येत रामपथ आणि भक्तिपथ असे दोन मार्ग असतील ज्यावर जागोजागी स्टेज उभारले जाणार आहेत.. याच स्टेजवरुन साधु-संतही उभे राहत मोदींना आशीर्वाद देणार आहे.. मोदींचा अयोध्येतला हा रोड शो भव्यदिव्य प्रमाणात साजरा करण्याची जय्यत तयारी सध्या सुरु आहे.