ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे वडील सतीश भाऊराव आव्हाड यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ज्युपिटर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आव्हाड यांच्या वडिलांची अंत्ययात्रा सायंकाळी ८ वाजता विश्वजीत सोसायटी, तीन पेट्रोल पंप, ठाणे येथून निघणार आहे. जवाहरबाग स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सतीश आव्हाड यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी तीव्र दु:ख व्यक्त केलेय.
सतीश आव्हाड यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. कळव्यातील मुकंद कंपनीत कार्यरत असताना त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी लढा उभारला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात, मुलगा, सून, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.