साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा दारुण पराभव

उदयनराजे भोसले यांना मोठा पराभवाचा धक्का बसला.  

Updated: Oct 24, 2019, 05:09 PM IST
साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा दारुण पराभव title=
संग्रहित छाया

सातारा : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हाती घेणाऱ्या उदयनराजे भोसले यांना मोठा पराभवाचा धक्का बसला. त्यांचा मोठा दारुण पराभव झाला. भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. विधानसभा निवडणुकीबरोबर ही पोटनिवडणूक झाली. मात्र, त्याधी निवडणूक प्रचाराची रणधुमाळीत जोरदार रंगत आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी प्रचार सभा घेतली. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दोन सभा झाल्या. शेवटची सभा भरपावसात झाल्याने याची जोरदार चर्चा झाली. मोदींच्या सभेपेक्षा पवारांच्या सभेची जादू साताऱ्यात चालल्याचे दिसून येत आहे.

उदयनराजे यांनी पक्ष प्रवेश केल्याने लोकांना भावले नसल्याचे या निवडणुकीत दिसून आले. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या चार महिन्यात उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिला. भाजपाचा झेंडा हाती घेऊन पोटनिवडणुकीला सामोरे गेलेल्या उदयनराजेंचा हा निर्णय सातारकरांना रुचला नाही. उदयनराजेंचा पोटनिवडणुकीत दारुण पराभव झाला. 

मोदी लाटेत साताऱ्यात घड्याळ चालले होते. पोटनिवडणुकीतही साताऱ्यातील जनतेने तोच कौल कायम ठेवला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून उदयनराजे पिछाडीवर राहिले. शेवटपर्यंत त्यांना आघाडी मिळालीच नाही. प्रचारावेळी पवारांनी भरपावसात घेतलेल्या सभेमुळे उदयनराजेंचा पाय आणखी खोलात गेला. शरद पवारांनीही राजेंना टोला लगावला.

राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील हे मोठ्या मताधिक्यांनी विजयी झालेत. त्यांनी आपला विजय हा सातारकरांना समर्पित केला आहे. लोकांनी निवडणूक हातात घेतली होती. हा लोकशाहीचा विजय आहे. ज्यानी मोठे केले त्यांना सोडून जाणे हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. म्हणून लोकांनी सोडून जाणाऱ्यांना धडा शिकवला आहे, असा टोला उदयनराजे यांना पाटील यांनी लगावला.

उदयनराजे भोसले यांना ३ लाख ६६ हजार १६६ मते मिळालीत तर श्रीनिवास पाटील यांना ४ लाख ५४ हजार ६५९ मते पडलीत. श्रीनिवास पाटील यांनी ८८ हजार ४९३ मतांची निर्णायक आघाडी घेतली होती. उदयनरांजेंनी लोकसभा निवडणूक जिंकलेली असतानाही विशेष कारण नसताना पक्षांतर करण्याचे धाडस केले. हे धाडस त्यांच्या अंगाशी आले. उदयनराजेंचा अंगाशी आलेला निर्णय त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर दुरगामी परिणाम करणारा ठरणार आहे, अशी चर्चा रंगत आहे.