'लेकीला सासरी पाठवल्याबद्दल परळीकरांचे मनापासून धन्यवाद'

२८ हजारांपेक्षा जास्त मतांनी पकंजा मुंडेंचा पराभव

Updated: Oct 24, 2019, 08:29 PM IST
'लेकीला सासरी पाठवल्याबद्दल परळीकरांचे मनापासून धन्यवाद' title=

परळी : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. राज्यात सर्वात महत्त्वाच्या परळी मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. बहीण-भावाच्या अटीतटीच्या लढतील अखेर धनंजय मुंडेनी बाजी मारली आहे. 

आज मतमोजणीच्या सुरवातीपासूनच धनंजय मुंडे आघाडीवर होते. प्रत्येक फेरीत यशाच्या दिशेने ते कूच करत होते. २८ हजारांपेक्षा जास्त मतांनी त्यांनी पकंजा मुंडेंचा पराभव केला आहे. जनतेनं मला स्वीकारलं नाही असं म्हणत, पंकजा मुडेंनी आपल्या पराभवाचा स्वीकार केला. 

निकाल महाराष्ट्राचा : महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील हे आहेत विजयी उमेदवार

पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'लेकीला सासरी पाठवल्याबद्दल परळीकरांचे मनापासून धन्यवाद' अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 

निवडणूक प्रचारादरम्यान सुद्धा त्यांनी पंकजा मुंडेंवर निशाना साधला होता. 'खणानारळाची ओटी भरून आता लेकीची सासरी पाठवणी करा' असं आवाहन त्यांनी परळीच्या जनतेने केले होते.